सरकारच्या वर्षपूर्तीच्या जाहिरातीतून शिंदे गायब, फडणवीसांनी अखेर बदला घेतलाच…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकार मधील जाहिरातीवरून नाराजी नाट्य रंगले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फ़ोटो गायब झालेला.
अखेर ठरलं! शिंदे गटातील दोघे केंद्रीय मंत्रिमंडळात, मोदींकडून खास भेट
असे असताना आता फडणवीस यांनी याचा बदला घेतल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारला आज वर्षपूर्ती झालेली आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच गायब झाल्याचे दिसून येत आहे.
मैत्रिणीचे तसले ; फोटो काढून मित्रांना पाठवले, पुण्यातील धक्कादायक कृत्य
देवा भाऊ सुपरफास्ट अशी जाहिरात काढण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे लोकप्रियतेमध्ये नंबर एक आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
त्या जाहिरातीवर टीका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून दुसरी जाहिरात काढण्यात आली होती. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी कालच संताप व्यक्त केला होता. प्रत्येक पक्षात कमी डोक्याचे लोक असतात, तशी जाहिरात काढणे मुर्खपणाच होता, असे फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान आता भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जाहिरातीमधून एकनाथ शिंदे गायब आहेत. जाहिरातीमध्ये रोजगाराच्या संधी आणि ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता दिल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटा आहे.