आजची मंत्रिमंडळ बैठक ठरली शेतकऱ्यांसाठी खास! शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय..
मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने जाहीर केली आहे.
याबाबत नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांची लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळणार आहे.
Views:
[jp_post_view]