शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना फसवी; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेवर पटोले यांनी टीका केली आहे.

पटोले म्हणाले कि, ही नवी योजना म्हणजे नमो फसवणूक योजना आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
मान्सूनचा मुहूर्त हुकला! २०१८ नंतर पहिल्यांदाच १० जून नंतर मान्सूनचं होणार आगमन, काळजी वाढली..

राज्य सरकार घोषणा, इव्हेंट्स आणि जाहिरातबाजी यापलीकडे काही करत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठका असो किंवा राजकीय सभा सगळीकडे घोषणाबाजी केली जात आहे. शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे केवळ घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. असे देखील ते म्हणाले
विजपुरवठा सुरळीत नाही केला तर महावितरणच्या विरोधात आंदोलन करणारआमदार अशोक पवार
शतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उध्वस्त झाला आहे. यावर राज्य सरकारकडून फक्त घोषणा करण्यात आल्या. परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. राज्य सरकारच्या घोषणा या केवळ प्रसिद्धीसाठीच आहेत. मात्र त्यांनी केलेल्या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी म्हटले.
गँगस्टर लॉरेन्सचा बुकीला धमकीचा कॉल, रेकॉर्डिंग झाले व्हायरल
दरम्यान केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी १२ हजार रुपये जमा होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना १ रुपयात पिक विमा मिळणार आहे.