शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार?; सत्तासंघर्षाचा निकाल ‘या’ दिवशी लागणार…
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार आहे. येत्या १०,११,१२ या तारखांना सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
तसेच या निकालाने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलणार आहेत. येत्या १५ तारखेला घटनापीठातील ५ न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती एम.आर.शाह निवृत्त होत आहेत. त्यानंतर कोर्टाला उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत.
यामुळे न्यायमूर्ती एम.आर.शाह निवृत्त होण्यअगोदर सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, हे निश्चित आहे. दरम्यान हा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती काय असणार यावर देखील विविध अंदाज व्यक्त केले जात आहे.
Views:
[jp_post_view]