Shikrapur : शिक्रापूरमध्ये थरारक घटना, भर चौकात बर्निंग कारची घटना, नेमकं काय घडलं?
Shikrapur : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे वर्दळीच्या अशा पाबळ चौकामध्ये एक कार अचानक पेटल्याचा प्रकार घडल्याने येथे बर्निंग कारचा थरार पाहण्यास मिळाला.
या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ओव्हर हीटिंगमुळे ही कार पेटल्याचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास शिक्रापूर येथील व्यापाराचे मुख्य ठिकाण असलेल्या पाबळ चौक येथे ही घटना घडली.
एमएच १४ जीयु २५१७ या कारने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला होता. वाहतूक पोलीस मिलिंद देवरे व ज्ञानेश्वर गोरे यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. Shikrapur
नागरिकांची मोठी गर्दी…
दरम्यान, ही घटना झाल्यावर पाण्याचा टँकर बोलवून गाडीवरील आज नियंत्रणात आणण्यात आली. पाण्याच्या टँकरसाठी संतोष शेंडे सुधीर रुके यांनी मदत केली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.