शेखर वढणे यांची भाजप दक्षिण पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड, सामान्य कुटुंबातील तरुणाला पक्षाकडून संधी…


सासवड : येथील शेखर अशोक वढणे यांची भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे सासवडसह संपूर्ण पुरंदर तालुक्यातून त्यांचे जोरदार अभिनंदन होत आहे. त्यांच्या कामाची पक्षाने दखल घेतली असून मोठी जबाबदारी दिली आहे.

राजकीय पार्श्वभूमी नसतानाही वढणे यांच्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांचे वडील राज्य परिवहन मंडळातून वाहक म्हणून सेवानिवृत्त झाले असून, आई गृहिणी आहेत. त्यांची पत्नी सोलापूर शहर सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर बंधू पुणे सीआयडीमध्ये हेडकॉन्स्टेबल आहेत.

एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. शेखर वढणे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण म.ए.सो. वाघीरे हायस्कूल सासवड येथे झाले. त्यांनी वाघीरे महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी घेतली.

अभ्यासाबरोबरच ते एक उत्तम हॉलीबॉलपटू म्हणूनही परिचित आहेत. भाजपमध्ये सक्रिय असलेले शेखर वढणे यांनी पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.

सुरुवातीला सासवड बुथ प्रमुख नंतर सासवड शहर भाजप अध्यक्ष, नंतर पुरंदर तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, तसेच सातारा जिल्हा लोकसभा विस्तारक, सातारा जिल्हा संघटक सरचिटणीस, तसेच पुणे जिल्हा दक्षिण संघटक सरचिटणीस, तसेच पुणे दक्षिण जिल्हा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी. अशा पदांवर त्यांनी काम केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!