मोठी बातमी! पुणे जमीन गैरव्यवाहर प्रकरणी मोठी कारवाई, शीतल तेजवानीला अटक; ३०० कोटींचा व्यवहार नडला, पार्थ पवारांचे काय होणार?

पुणे : पुण्यातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीला शीतल तेजवानी हिने बेकायदेशीरपणे जमीन विक्री केल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी अखेर शीतल तेजवानी हिला अटक केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये, प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.

पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी देखील झाली. मीडिया रिपोर्ट्समुळं आपणास लक्ष्य केलं जात असल्याचा दावा तेजवानीने याचिकेत केला होता. एफआयआर मीडिया रिपोर्टवर गुन्हा दाखल केला असून मीडियात फरार घोषित करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
दुसऱ्या जमिनीप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून तेजवानीची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद देखील वकिलांनी केला होता. मुंढवा जमीन गैरव्यवहाराबद्दल आधी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस ठाण्यात दिग्वीजय पाटील, शीतल मेजवानी आणि रविंद्र तारु या़ंच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, पुणे पोलिसांनी देखील यात उडी घेत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता, शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे.
