दहावीच्या शेवटच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…; उरळी कांचनमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीचे फूस लावून अपहरण.


उरुळी कांचन : दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देण्यासाठी वडिलांसोबत शाळेपर्यंत आलेल्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना उरुळी कांचन येथे घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी हि उरुळी कांचन परिसरातील एका नामांकित विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. बुधवारी (ता.18) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दहावीचा भूगोलाचा शेवटचा पेपर देण्यासाठी महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन येथे तिला तीच्या वडिलांनी दुचाकीवरून सोडले होते. शेवटचा पेपर असल्याने वडील तिला शाळेच्या गेटवर सोडून घरी परतले. मात्र, दुपारी साडेबारा वाजता महात्मा गांधी विद्यालयातील एका शिक्षकाने सदर मुलीच्या वडिलांना फोन करून तुमची मुलगी परीक्षेला आली नसल्याचे कळवले.

मुलीच्या वडिलांनी तातडीने शाळेत धाव घेऊन शिक्षकांशी चर्चा केली. “मी सकाळी तिला गेटवर सोडले होते,” असे त्यांनी सांगितले, मात्र प्रत्यक्ष वर्गात ती परीक्षेसाठी बसलीच नव्हती. नातेवाईक आणि शिक्षकांनी शाळेच्या परिसरात तसेच उरुळी कांचनमध्ये सर्वत्र शोध घेतला, परंतु मुलगी मिळून आली नाही. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही कोणीतरी अज्ञात इसमाने तिला अज्ञात कारणावरून पळवून नेले असावे, असा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!