सोलापूर हादरवणारी घटना! अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं…


सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागातून पतीने पत्नीची कोयत्याने गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण राज्ये हादरले आहे.

सविता जकप्पा पुजारी (वय.३५, रा. हत्ताळी, ता. चडचण, जि. विजयपूर) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती जकप्पा मणगेरी पुजारी (रा. हत्ताळी, ता. चडचण, जि. विजयपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जकप्पा पुजारी हा ऊसतोड कामगार असून त्याचे कर्नाटकातील विजयपूर येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पत्नी सविताला मिळाली होती. या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. काही दिवसांपूर्वी जकप्पा हा वडापूर येथील दत्तात्रय गणेशकर यांच्या शेतात ऊसतोड कामासाठी दाखल झाला होता.

त्याच ठिकाणी दाम्पत्यामध्ये पुन्हा एकदा अनैतिक संबंधाच्या विषयावरून जोरदार भांडण झाले. वाद तीव्र होताच जकप्पा हा रागाच्या भरात गेला आणि त्याने जवळच असलेल्या कोयत्याने पत्नी सविताच्या डोक्यावर व गळ्यावर सलग प्रहार करून तिचा खून केला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.

या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वडापूर परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली असून, या निर्घृण हत्येबद्दल लोकांत संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!