16 वर्षांपासून ती माहेरीच आली नाही, खरात तिला…”; फरार कल्पना खरातच्या माहेरच्या लोकांचा धक्कादायक खुलासा


पुणे: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आला आहे. त्याच्या काळ्या कारनाम्यात सहभागी असलेल्या अनेक व्यक्तींची चौकशी केली जात आहे.आता खरातची पत्नी कल्पना खरात एसआयटीने चौकशीचा फास आवळताच फरार झाली आहे. ती फरार झाल्यामुळे तिचा खरातच्या काळ्या कारानाम्यांमध्ये मोठा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भोंदू बाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार होताच एसआयटीने तिच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली आहे. यातून खरातची पत्नी सोळा वर्षापासून माहेरीच आली नसल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे
खरात तिला माहेरी कधीही भेटायला येऊ देत नव्हता, तिने विवाह झाल्यानंतर माहेरशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. ती कधी भावालाही भेटायला आली नव्हती, अशी माहिती माहेरच्या लोकांनी दिली आहे.

त्यामुळे आता खरात आपल्या बायकोला माहेरी का पाठवत नव्हता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कल्पना खरातने देखील नवऱ्याच्या मदतीने शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदीत फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. आता या फरार कल्पना खरातच शोध घेतला जात आहे.

तसेच कल्पना खरात परदेशात पळून जाऊ नये यासाठी तिच्या विरोधात लूकाऊट नोटीस काढली आहे. अशातच कल्पना खरातचा शोध शोध घेण्यासाठी एसआयटीचं पथक सिन्नर मधील पाडळी येथे कल्पनाच्या माहेरी पोहोचलं असता माहेरच्या लोकांनी एसआयटीला कल्पना बाबत धक्कादायक माहिती दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!