Crime Murder News : विवाहितेवर अत्याचार करून धारदार हत्याराने केला निर्घृण खून; नदीपात्रातील वाळूमध्ये पुरला मृतदेह

Crime Murder News : एका विवाहितेवर अत्याचार करून डोक्यावर, कानावर, छातीवर धारदार हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्या महिलेचा मृतदेह नदीपात्रातील वाळूमध्ये बुजण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव येथून समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मायाबाई संजय मोरे (वय ३५, वर्षे) अशे मृत्यू झालेल्या महिलांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथील मायाबाई संजय मोरे (वय ३५, वर्षे) ही महिला आपल्या मुलासह २ मार्चला रात्री दहाला झोपली होती. मायाबाईंच्या सासऱ्याला दवाखान्यात दाखल केले होते, त्यामुळे त्यांचे पती त्याच ठिकाणी होते.

३ मार्चला पहाटे चारच्या सुमारास मायाबाईंचा मुलगा गौरवला जाग आली असता त्याला आई दिसली नसल्याने त्याने शेजारी राहणाऱ्या काकाला याबाबत माहिती दिली. मायाबाईंचा शोध सुरू केला असता वरखेडे खुर्द शिवारात मक्याचे ताटे ठिकठिकाणी तुटलेले सापडले. तिथेच रक्त देखील सांडलेले दिसले.
त्या जागेवरच काचेच्या तुटलेल्या बांगड्या सापडल्याने घातपात झाल्याचा कुटुंबीयांना संशय आला. काहीजणांनी गिरणा नदीकडे शोध घेतला असता तिथे मायाबाईंचा अर्धवट बुजलेला मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढला असता मायाबाईंच्या डोक्यावर, दोन्ही कानांजवळ, छातीवर मांडीवर धारदार हत्याराने वार केल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे.
दरम्यान, पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहे.