Sharmila Pawar : चुलत्याच्या पुढे जायचं नाही!! शर्मिला पवारांकडून अजितदादांवर जोरदार बॅटिंग, नेमकं काय घडलं?


Sharmila Pawar : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत कितीजण आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत कितीजण आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तसेच पवार कुटुंबातही शरद पवार यांच्या बाजूने काहीजण आहेत.

तर अजित पवार यांच्याबाजूने काहीजण आहेत. आता पवार कुटुंबातील सर्व सदस्य सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. ”खावा कुणाचं बी मटण, दाबा तुतारीचं बटण…एक वाटी रस्सा अन् पाच वर्ष बोंबलत बसा” अशा अस्सल ग्रामीण भाषेत शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी इंदापूर तालुक्यातील मतदारांशी संवाद साधला.

तसेच ‘चुलत्याच्या पुढे नाही जायचे…तू काहीही हो, तू सरपंच हो, पंतप्रधान हो, प्रेसिडेंट हो पण शेवटी वडील ते वडील आणि चुलता तो चुलता असतो. वडीलधाऱ्यांना सन्मान आपण प्रत्येकाने दिलाच पाहिजे, अशा शब्दात शर्मिला पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचा देखील समाचार घेतला.

सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शर्मिला पवार यांनी इंदापूर तालुक्यातील उद्धट गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाल्या की, उद्धट गावांमधील आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांचा कसा मान ठेवतो हे दाखवले पाहिजे.

अख्खा महाराष्ट्र आणि भारत देशाला ही कळायला पाहिजे, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर भोर इथली जनता काय लेचेपीची नाही. ती पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. येणाऱ्या सात तारखेला जनतेचा कौल हा निश्चितपणे साहेबांच्या आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूने आहे, असं म्हणत शर्मिला पवार यांनी आपले थोरले दिर उपुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

शर्मिला पवार यांनी आज सोमवारी इंदापूर भागाचा दौरा केला. यावेळी शर्मिला पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. माझ्या इंदापुरातील दौऱ्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. युगेंद्र पवार यांना बारामतीत काही लोकांनी घेरले होते. Sharmila Pawar

या लोकांना त्यांची चूक कळाली असेल. रोहित पवार आणि युगेंद्रदादा खंबीर आहेत, असे शर्मिला पवार यांनी म्हटले. सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी अख्खे पवार कुटुंब मैदानात उतरले आहे.

त्यामुळे अजित पवार हे कुटुंबात एकटे पडले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी गावोगावी जाऊन श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार आणि रोहित पवार मैदानात उतरले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!