आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये 88 हजार कोटींची घसरण, देशात मंदी येणार? भविष्यात परिस्थिती चिंताजनक…

नवी दिल्ली : सध्या भारतातील आयटी कंपन्या अडचणीत आल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात मोठी मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याची अनेक कारणे समोर येत आहेत. अमेरिकेचे टेरीफ प्रकरण, नवीन सरकारची अचानक बदललेली धोरणे तेथील वाढती महागाई आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता ही कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
याचा परिणाम सर्वाधिक भारतावर झाला आहे. यामध्ये आयटी कंपन्यांचे बाजार मूल्य तब्बल 88 हजार कोटी रुपयांनी घटले आहे. एकूणच देशात नव्या मंदीची चाहूल येऊ लागली आहे. यामुळे येणाऱ्या काळात धोरणात्मक निर्णय भारत सरकारला घ्यावे लागतील. या वर्षात अमेरिकेमध्ये 40% प्रमाणात महागाई वाढू शकते व तेथील मंदीचा फटका भारतात बसण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने यावर वेळीच पावले उचलली व आपल्या बाजारपेठ युरोपियन देशांमध्ये केंद्रित केल्या, तर फरक पडू शकतो असेही अर्थतज्ञांचे मत आहे. सध्या शेअर बाजारात मोठी पडझड होत आहे. त्याचे परिणाम स्थानिक पातळीवर देखील दिसू लागले आहेत.
ग्रामीण भागातील ही युवक व्यावसायिक व्यापारी विक्रेते शेअर मार्केटमध्ये येऊ लागले आहेत. याबाबत अनेकांना माहिती नसली तरी याची ते चर्चा करत असतात. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये झालेली पडझड ही गाव पातळीवरही जाणवू लागली आहे.
देशातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. विप्रो कंपनीचे 16% पर्यंत घसरलेले शेअर, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अशा अनेक कंपन्यांचे शेअर्स सध्या मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत.
गुंतवणूकदाराचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपन्यांची देखील मार्केट व्हॅल्यू 88 हजार कोटींनी घसरल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मंदी जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काळात सावध राहावे लागणार आहे.