ऐन हिवाळी अधिवेशनात शरद पवारांच्या आमदाराला कोर्टाचं समन्स; आमदाराची बदनामी भोवणार?

पुणे : सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना कोर्टाने समन्स बजावलं आहे.अजित पवार पवार गटाच्या आमदाराच्या बदनामी प्रकरणी त्यांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मात्र हिवाळी अधिवेशनामुळे रोहित पवार न्यायालयात हजर राहतील, का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाइलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया मीडियावर व्हायरल केल्यानंतर कोकाटे यांना विरोधकांनी धारेधर धरले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्याऐवजी रमी खेळत असल्याचा आरोप करत विरोधक कोकाटेंवर तुटुन पडले होते.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांनी बदनामी केल्याचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा आदेश काढला आहे.

दरम्यान कोकाटेंचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ अंगलट आल्याने त्यांना क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणामुळे त्यांचे कृषीमंत्री काढून घेऊन त्यांच्याकडे क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. हाच युक्तीवाद कोकाटेंनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत याआधी केला होता. रोहित पवारांनी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने आपले कृषीपद गेले, माझ्या वैयक्तीक प्रतिमेला आणि पक्षाला मोठा धक्का बसला, असा युक्तीवाद कोकाटेंनी न्यायालयात केला आहे.

रोहित पवार हे विधान परिषद सदस्य नसतानाही त्यांना व्हिडिओ कसा मिळाला, असा प्रश्न कोकाटे यांनी न्यायालयात उपस्थित केला आहे. आता आज कोकाटे-पवार यांच्याकडून न्यायालयात काय दावे–प्रतिदावे होतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
