मत चोरी प्रकरणी शरद पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली अन्….

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत आहेत. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला असून याबाबत अनेक गोष्टी त्यांनी दाखवल्या आहेत.

यामुळे निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत राहुल गांधी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने कसा गैर प्रकार करून कशी मत चोरी केली याबाबत अनेक दावे राहुल गांधी करत आहेत. असे असताना यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील एक मोठं वक्तव्य करून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती. ते मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही माणसं येऊन मला 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होती. पण त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेविषयी माझ्या मनात कोणताही संशय नव्हता. राजकारणात असे लोक भेटत असतात. त्यामुळे त्यावेळी मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची राहुल गांधी यांची भेट झाली.
त्यावेळी राहुल गांधी आणि माझे मत असे काही करणे योग्य नाही. हा आपला रस्ता नाही, आपण लोकांकडे जाऊन आणि त्यांचे आशिर्वाद मिळवू, असे आम्ही ठरवले. असेही शरद पवार म्हणाले. यामुळे येणाऱ्या काळात यावरून राजकीय वातावरण तापणार असून यावर भाजप नेत्यांनी अजून प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.