मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, आरक्षण कस मिळणार? थेट पर्याय सांगितला….


मुंबई : सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलकांनी हजेरी लावली आहे. यामुळे दिवसेंदिवस सरकारवर दबाव वाढत चालला आहे. आता मराठा समाज आक्रमक झाला आहे.

सध्या संपूर्ण राज्यभरातून हे आंदोलक आले आहेत. मुंबईमध्ये एक भगव वादळ आलं असल्याचे दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर मोठं वक्तव्य केले आहे.

शरद पवार म्हणाले, 72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते. घटनेत बदल (दुरुस्ती) करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. असा पर्याय त्यांनी सांगितला आहे. यामुळे हे एक महत्वाचे वक्तव्य आहे. भूमिका जाहीर करण्याबाबत त्यांना विचारणा केली जात होती.

आता आज याबाबत शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल तर त्याला आरक्षणाच्या मार्गाने जावे लागेल असा एक विचार आहे. केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याचा वेळ आली आहे, असेही पवार म्हणाले.

सध्या शेतकऱ्यांच्या जमिनी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. विकासाच्या नावाखाली शेतीच्या जमिनी कमी होत आहेत. तर शेतीवर अवलंबून घटक वाढत आहे. यामुळे याबाबत निर्णय घेण्यात यावा, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे. यामुळे आता आरक्षण मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!