Sharad Pawar : शरद पवार पालखी सोहळ्यात चालणार? म्हणाले मी चालणार नाही, पण….


Sharad Pawar : राज्यामध्ये सर्वत्र आषाढी वारीचा उत्साह दिसून येत आहे. येत्या ७ जुलै रोजी जेष्ठ नेते शरद पवार वारीमध्ये पायी सहभागी होत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष होता.

काल शरद पवार यांनी या बातम्यांचे खंडन केले. माझ्या गावावरून ही वारी जाते. त्यामुळे मी एक दिवस थांबून या ठिकाणी स्वागत करणार आहे, मात्र मी पालखीत सोहळ्यात पायी चालणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

संत तुकोबारायांचा पालखी सोहळा बारामती वरूनच पंढरपूर कडे जातो. साहजिकच यावर्षी एक दिवस आपण थांबणार असून, पालखीच्या स्वागतासाठी थांबणार आहे, मात्र पालखीसोबत चालणार नाही असे शरद पवार यांनी सांगितले

शरद पवार म्हणाले, ‘मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार ही बातमी खोटी आहे. पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. Sharad Pawar

पालखीच्या स्वागतासाठी मी तिथे थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार आहे, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!