Sharad Pawar : विधानसभेच्या तोंडावर राज्यात शरद पवारांना मोठा धक्का!! जिल्ह्याच गणित बदलणार? जाणून घ्या…

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
निवडणूक आयोगाकडून राज्यात कधीही अचारसंहितेची घोषणा होऊ शकते. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अमरावती जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वी २५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार प्रदीप राऊत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानं पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले, त्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. राऊत यांना अवघ्या पाच महिन्यातच पदावरून हटवण्यात आल्यानं राऊत समर्थकांमध्ये नाराजी आहे.
विधासनभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. अशातच अमरावती जिल्ह्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. Sharad Pawar
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या २५ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांना पदावरून पायउतार केल्यामुळं नाराज पदाधिकाऱ्यांनी बंड केले आहे.