लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात बारामतीच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष ! अजित पवार , शरद पवार काय रणणिती आखणार !!

Loksabha : पश्चिम महाराष्ट्रातील सात आणि कोकण आणि मराठवाड्यातील प्रत्येकी दोन जागांसाठी ७ मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यांच्यात या जागांवर लढत होत आहे. पण या टप्प्यातील लढतीचे लक्ष संपूर्ण देश पातळीवर चाललेल्या पवार कुटूंबियांकडे लक्ष असणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, माढा आणि सोलापूर या जागांवर ७ मे रोजी मतदान होत आहे. एनडीए कॅम्पमधून तिसऱ्या टप्प्यातील ११ पैकी ६ जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे मित्रपक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे तीन जागांवर उमेदवार आहेत तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना दोन जागांवर आपले नशीब आजमावत आहे.
त्याचवेळी, इंडिया आघाडीच्या बाजूने, तिसऱ्या टप्प्यात, काँग्रेसचे उमेदवार 3 जागांवर लढत आहेत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना चार जागांवर लढत आहे. याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या चार उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आमने-सामने लढत होत आहे. 2019 मध्ये एनडीएने एकतर्फी विजय नोंदवला होता, मात्र यावेळी राजकीय समीकरणे बदलली आहेत. अशा स्थितीत आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.