शरद पवार मोठ्या चक्रव्यूहात अडकणार? नरेंद्र मोदींच्या सन्मानाला जाणार की विरोधकांच्या बैठकीला, कार्यक्रम एकाच दिवशी.?


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार १ ऑगस्टला प्रमुख पाहुणे असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर प्रथमच नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर दिसणार आहेत. तसेच दुसरीकडे राज्यसभेत १ किंवा १ ऑगस्टला दिल्लीचे विधेयक येऊ शकते. याला आम आदमी पक्षाकडून विरोध केला आहे.

शरद पवारांनी देखील हजेरी लावून या विधेयकाविरोधात मतदान करावे असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. त्यामुळे आता शरद पवार पुण्यात थांबणार की दिल्लीत जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

शरद पवार यांनी नुकतीच मुंबईत एक बैठक घेतली होती. त्यात त्यांनी “आपल्याला भाजपविरोधात लढायचे आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. देशातील विरोधकांची आघाडी ‘INDIA’ च्या बैठकीचे चांगले नियोजन करा,” अशा सूचना दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!