Sharad Pawar : अजित पवारांना आता सोबत घेणार का? शरद पवारांच्या उत्तराने चर्चांना उधाण…


Sharad Pawar : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच दिवशी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होईल.

राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले ४० आमदार, लोकसभा निवडणुकीत मिळालेलं मोठं यश आणि राजकारणातला अनेक दशकांचा अनुभव अशा अनेक पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुळ राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अख्खा महाराष्ट्र पालथा घालत आहेत.

पुतण्या अजितदादांसोबत गेलेल्या वरिष्ठ नेते मंडळींच्या आणि आमदारांच्या मतदारसंघात जाऊन ‘गद्दारांना आता माफी नाही’ असं म्हणत थेट खोडावर घाव घालण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत.

याचदरम्यान निवडणूक निकालानंतर अजित पवार हे भूमिका बदलतील आणि भाजपची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे नसून ते एकच आहेत, असेही अधूनमधून लोक बोलत असतात.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना सोबत घेणार का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीची तयारी, उमेदवारांची निवड, फुटीर आमदारांबद्दलची भूमिका, महाराष्ट्रातले वातावरण अशा विविध विषयांवर शरद पवार यांनी विशेष मुलाखत दिली. Sharad Pawar

शरद पवार म्हणाले की, ”हा काय माफी किंवा कोण दोषी असा प्रश्न नाही. प्रश्न फक्त एकच आहे की तुमची विचारधारा, आज ज्यांच्या मताची विचारधारा आम्हाला मंजूर नाही. आमची विचारधारा त्यांना मंजूर नाही, असं म्हणता येणार नाही. कारण ५-५ वेळेला आमच्या विचारधारेचा आमचा कार्यक्रम घेऊन ते निवडून येऊन सत्तेत बसले. आता काही आमचं धोरण काही बदलवलं असं काही नाहीय आणि त्यामुळे जोपर्यंत ज्या विचारधारेचा आमचा सक्त विरोध आहे.

त्यांच्याबरोबर जाऊन बसणे आणि त्यांच्यासोबत काम करणं हे भूमिका असेल, तर कुणालाचा प्रवेश नाही. अजित पवार असं नाही, कुणालाच नाही. जर आमच्यासारखी त्यांची विचारधारा असेल तर त्या ठिकाणी कुणाची अडवणूक केली जाणार नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. भाजपासोबत सत्तेत बसणार नाही, अशी भूमिका घेऊन जर पुन्हा मूळ विचारसरणी स्वीकारली तर कुणाची अडवणूक करणार नाही, असे उघडपणे शरद पवार यांनी सांगितल्याने निवडणूक निकालानंतर राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!