Sharad Pawar : सुप्रिया सुळे यांच्या गाडीत असलेला नेता नेमका कोण? आता नाव आलं समोर, अजित पवारांना मोठा धक्का….

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील हळूहळू वाढताना दिसत आहे. अशातच काल मोदी बागेत सकाळी एका मोठ्या व्यक्तींनी शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे, ही मोठी व्यक्ती कोण आहे, त्याची चर्चा आता रंगली आहे.
मोदी बागेतून सुप्रिया सुळेंच्या गाडीत जाताना त्या व्यक्तीने आपला चेहरा फाईलने लपवला होता. याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत, फाईलने तोंड लपवलेला हा नेता माजी मंत्री राजेंद्र शिंगणे असल्याची चर्चा आता सुरू आहे. Sharad Pawar
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वाटेवर असल्याची चर्चा आहे. काल(मंगळवारी) सोशल मीडियात सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील चेहरा लपवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
व्हायरल व्हिडीओ मधील स्वतःचा चेहरा फाईलने लपवणारी व्यक्ती राजेंद्र शिंगणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजेंद्र शिंगणे अजित पवार यांची साथ सोडून तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच शिंगणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत देखील दिली आहे.