Sharad Pawar : शरद पवारांचे अजित पवारांना दोन मोठे धक्के! सिल्व्हर ओकवर सगळं ठरलं, दोन बडे नेते तुतारी हाती घेणार…


Sharad Pawar : विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना शरद पवार यांनी आता आपले पत्ते एक-एक करुन उघड करायला सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सत्ताधारी गटातील बड्या नेत्यांना गळाला लावल्यानंतर शरद पवार अजूनही स्वस्थ बसलेले नाहीत.

तसेच आता निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटाला शह देण्यासाठी शरद पवार राजकीय डाव टाकताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांचे निष्ठावंत सतीश चव्हाण यांना शरद पवार गटाकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. सतीश चव्हाण यांनी नुकतेच महायुतीवर खरमरीत टीका करणारे पत्र लिहले होते. सतीश चव्हाण हे गंगापूर विधानसभेसाठी इच्छूक आहेत.

त्यामुळे सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते. ते लवकरच तुतारी हाती घेऊन शरद पवार गटात प्रवेश करु शकतात. शरद पवार गटाकडून अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांची कोंडी करण्यासाठी डाव टाकले जात आहेत. Sharad Pawar

दरम्यान, यामध्ये कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्यासमोर शरद पवार गटाकडून राजकीय आव्हान निर्माण केले जाणार आहे. ज्ञानदेव पवार हे आज मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

ज्ञानदेव पवार हे माणगावचे माजी नगराध्यक्ष पवार आहेत. ते सध्या शिंदे गटात आहेत. त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्याविरोधातील मविआची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ज्ञानदेव पवार यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!