शरद पवारांनी भाकरी फिरवली! सुप्रिया सुळे यांच्यासोबत ‘या’ नेत्याला बनवलं कार्यकारी अध्यक्ष


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीत कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद तयार करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या दोघांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती स्वत: पवार यांनी दिली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आणखी बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात
आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा विधानसभेचीही जबाबदारी असेल. तसंच प्रफुल्ल पटेल यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सुळे आणि पटेल यांच्यासह सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांना देखील राष्ट्रीय राजकारणातील जबाबदारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!