Sharad Pawar : ऐन निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी फेटाळली..


Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयात शरद पवार यांच्या पक्षातर्फे दाखल याचिका फेटाळली आहे. यामुळे अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह कायम राहणार आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यापासून रोखण्यासाठी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय देताना स्पष्ट केले की, अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह कायम राहणार आहे, ज्यामुळे शरद पवार यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही.

अजित पवार यांचे वकील सर्वोच्च न्यायालयात शरद पवार यांच्या याचिकेला विरोध करताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी काही उमेदवार घड्याळ चिन्हावर अर्ज दाखल करण्यास तयार आहेत. Sharad Pawar

न्यायालयाने याबाबत स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाने यापूर्वीच अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि नाव दिले आहे. त्यामुळे या निर्णयावर आता कोणतीही अडचण येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांचा याचिकेतला युक्तिवाद असा होता की, घड्याळ चिन्हाच्या २५ वर्षांच्या संबंधामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीतही अजित पवार यांनी हे चिन्ह वापरले होते, आणि आता विधानसभेतही तेच चिन्ह वापरले जात आहे. यामुळे शरद पवार यांना अपेक्षित स्पष्टता साधता आलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!