Sharad Pawar : अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचे जोरदार उत्तर, म्हणाले, राजीनामा दिला तरी तो…

Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल केलेल्या गोप्यस्फोटांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की त्यातील काही गोष्टी मला पहिल्यांदा समजल्या. त्यात बॉम्ब होता का? स्फोट होता का? याचा अभ्यास करावा लागेल. मी कुणाला देखील बोलावलं नव्हतं. मी पक्षाचा अध्यक्ष असल्यानं अनेकांशी सुंसवाद ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थक आमदार आणि खासदारांची बैठक पुण्यात घेतली. यावेळी राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांना मदत, लोकसभा निवडणूक तयारी यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, काही सहकारी ज्या रस्त्यानं जाण्याचा विचार करत होते, तो मुद्दा आम्हाला किंवा जनमानसात आम्ही जे शब्द दिले होते त्यांच्याशी सुसंगत नव्हता. भाजप आणि तत्सम प्रवृत्ती विरोधात आमची भूमिका होती. Sharad Pawar
आमचे लोक जे निर्वाचित झाले त्यांना भाजप विरोधी मतं मिळाली होती. जाहीरनामा मांडला होत्या त्यापेक्षा विपरित काम करावं, असे लोकांना मान्य होणार नव्हती, असे शरद पवार म्हणाले.
मी राजीनामा दिल्यानंतर तो मागं घेण्यासाठी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना सांगायची गरज नव्हती. मला स्वत:ला माझा निर्णय घेण्याची कुवत आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आमच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या पण राजीनामा देतो, अशी चर्चा झाली नव्हती, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे