Sharad Pawar : अखेर शरद पवार निवृत्तीवर बोललेच, निवृत्ती घेण्यावर आता पहिल्यांदाच केले मोठे वक्तव्य…


Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अजूनही राजकारणात आहेत. वयाच्या ८४ व्या वर्षीही शरद पवार प्रचंड ऍक्टिव्ह आहेत. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. वय झाले तरी ते निवृत्त होत नाहीत. कधी निवृत्त होणार? अजित पवार यांच्या या विधानावर शरद पवार यांनी म्हंटले की, त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे.

त्यावर मी बोलू इच्छित नाही, असे सांगतानाच माझ्या विरोधकांनीही कधी हा विषय काढला नाही, असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला आहे. शरद पवार यांनी आज माध्यमंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना अजितदादा यांच्या टीकेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली.

शरद पवार म्हणले, त्यांनी काय बोलायचं यावर मी बोलू इच्छित नाही. वयाचा हिशोब काढणं त्यांना योग्य वाटत असेल तर ते बोलू शकतात. माझ्या बाबत विचार करायचा झाला तर मी १९६७ मध्ये संसदीय राजकारणात आलो. तेव्हापासून मी एकदाही ब्रेक घेतला नाही. संसद आणि विधानसभेत सातत्याने आहे. Sharad Pawar

या काळात माझ्या सक्रियतेबाबत किंवा माझ्या कामाच्या पद्धतीबाबत माझ्या विरोधकांनीही कधी विषय काढला नाही, असे शरद पवार म्हणाले.पुढे ते म्हणाले, वयाचा प्रश्न असेल तर मोरारजी देसाई हे सुद्धा ज्येष्ठ होते. ते काम करत होते. लोकं त्यांच्यासोबत होते. अनेक नेते वय वाढले तरी सक्रिय होते. त्यामुळे अशा गोष्टी काढणे योग्य नाही. मी त्या खोलात जात नाही, असे पवार म्हणाले.

मी निवडणूक लढणार नाही हे मी जाहीरपणे सांगितले आहे. त्यावरून काही दिशा स्पष्ट होतात. एकदा जाहीर केल्यानंतर पुन्हा तो मुद्दा काढण्याची गरज नाही. राज्यसभेचे माझे एक-दोनच वर्ष राहिली आहेत.

ते अर्धवट सोडू का? मला माझ्या पक्षाने राज्यसभेत पाठवले. ते अर्धवट सोडून कसं थांबू? मला लोकांना संसदेत पाठवले आहे. जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे, तोपर्यंत त्यांची सेवा करणे आणि सहकाऱ्यांना मदत करणे हे माझे काम आहे, ते मी करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शरद पवार यांना निवृत्तीनंतर कोणत्या क्षेत्रात काम कराल? असा सवाल करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत म्हणले, काम करण्यासाठी मला अनेक क्षेत्र आहेत. साखर उद्योगात मी लाईफ मेंबर आहे. काही संस्थेत मी अजीवन सभासद आहे. शिक्षण संस्थेतही काम करता येते. अनेक संस्थेत काम करता येते. त्यामुळे सत्तेच्या राजकारणातच असले पाहिजे असे नाही, असे पवार यांनी निवृत्तीच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!