Sharad Pawar : घड्याळ काढून अजित पवारांना दुसरं चिन्ह द्या..!! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांची कोर्टाकडे मोठी मागणी

Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. मात्र यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्यामुळे लवकरात लवकर चिन्हाबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती शरद पवारांनी सु्प्रीम कोर्टाला केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्त्वाचे आहे, अशी विनंती शरद पवारांकडून सुप्रीम कोर्टाला करण्यात आली आहे.
जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे फ्रिज करण्यात यावं, असेही शरद पवार म्हणाले आहेत. घड्याळ या चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको, अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे.
निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे, त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्यास सांगावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. Sharad Pawar
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या पक्षाला ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ असं नाव दिलं होतं तर तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह देण्यात आलं होतं.
त्या चिन्हावर निवडणूक लढवून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत चांगले मैदान मारलं होतं. त्यांच्या पक्षाचे आठ खासदार निवडून आले होते. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मात्र एकच खासदार निवडून आला होता.
सर्वोच्च न्यायालयाचे या प्रकरणावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाच्या पक्षाचे चिन्ह असण्याची शक्यता आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला या पुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.