शरद पवारांच नवं भाष्य ! सर्व पक्षीय बैठकित ठरल्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षण द्या ….!!


मुंबई  :  मागील काही दिवसांपासून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा पवित्रा मराठ्यांनी घेतला आहे. आरक्षणावरून राज्याचे राजकारण देखील बदलले आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात जुंपली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय घडलं, याबाबत एक भाष्य केले आहे .

 

शरद पवार म्हणाले की, “मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बौलावली होती. मीदेखील त्या बैठकीला गेलो होतो. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु हे करत असतांना दुसऱ्याच्या ताटातून आरक्षण काढून घेतलं नाही पाहिजे. याबाबत केंद्र सराकरने (Central Govt) निर्णय घ्यावा, तसाच ठराव आम्ही बैठकीत घेतला होता.”

राज्यात सध्या मराठा समाज आणि ओबीसी (OBC) समाजामध्ये वाद सुरु आहे, त्यावरुन शरद पवारांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले आहे. “दोन समाजात तेढ निर्माण करण्यात भाजपचा हात आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवून इतर कोणालाही धक्का न लावता स्वतंत्रपणे आरक्षण देता येईल”, असे शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर चा अल्टिमेटम दिला आहे आणि मराठा समाजाला ओबीसी  मधूनच आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे .त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेला जरांगे पाटील प्रतिउत्तर देणार का ? म्हणून याकडे पहिले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!