नाना पटोलेंवर शरद पवारांची पहिल्यांदाच टिप्पणी , म्हणाले…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आहे. अनेक नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप करत त्यांच्यावर टीका केली आहे.

ठाकरे सरकार पडण्यास नाना पटोले जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही केला होता. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसमधील नाराजी नाट्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले मविआमध्ये कुठलाही वाद नाही. नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झालं आहे. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांना विश्वासात घेतलं नाही एवढीचं व्यथा आहे, पण आता तो विषय संपला आहे, असंही ते म्हणाले.

Views:
[jp_post_view]
