Sharad Pawar : EVM सेट होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन पाहिलेलं पण विश्वास ठेवला नव्हता, आता मात्र…, शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट…


Sharad Pawar : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या विरोधात उपोषण सुरू केले. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून त्यांनी आत्मक्लेश उपोषण सुरू केले. वयाच्या ९५व्या वर्षी बाबा आढाव यांनी सुरु केलेल्या उपोषणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी म्हटलं की, निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारावर लोकांमधून उठावाची गरज आहे. विधानसभा निकालाची राज्यभरात अस्वस्थता दिसत आहे.

निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून बाबा आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलाय. निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीच बघायला मिळाला नव्हता. स्थानिक निवडणुकीत असे प्रकार होत असल्याचं ऐकायला मिळतं. पण राज्यातल्या निवडणुकीत असं चित्र कधी बघायला मिळालं नव्हतं असंही शरद पवार म्हणाले. Sharad Pawar

ईव्हीएमबाबत शरद पवार यांनी म्हटलं की, काही लोकांनी ईव्हीएम कसं सेट करतात याचं प्रेझेंटेशनही आम्हाला दिलं. आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही ही आमची कमतरता होती. निवडणुकीत इतकं काही टोकाचं होईल असे वाटले न्हवते.

निवडणूक आयोगावर कधी संशय व्यक्त केला नाही पण निकालानंतर तथ्य दिसतंय. राज्यात २२ उमेदवारांकडून फेरमतमोजणीचा अर्ज करण्यात आला आहे. यातून काही साध्य होईल असं वाटत नाही असंही शरद पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group