शरद पवार म्हणाले लवकर लग्न करा अन् युगेंद्र पवार यांनी मनावर घेतलं दिली आनंदाची बातमी! सुप्रिया सुळे यांनी होणाऱ्या सुनेचे नावही सांगितलं…


बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार आता विवाह बंधनात अडकणार आहेत. युगेंद्र पवार यांची एंगेजमेंट झाल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियामध्ये फोटो शेअर करत दिली आहे. यामुळे पवार कुटूंबात पुन्हा एकदा आनंद सोहळा संपन्न होणार आहे.

युगेंद्र पवार यांची होणारी पत्नी तनिष्का प्रभू ही मुंबईची असून तिचे शिक्षण परदेशामध्ये झाले आहे. तनिष्काने फायनान्समध्ये शिक्षण घेतले आहे. यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा दोन महिन्यांपूर्वी पार पडल्यानंतर आता हा एक सोहळा होणार आहे.

दरम्यान, घरगुती पद्धतीने साखरपुडा झाली दोघांचा साखरपुडा पार पडला. दोघांच्या साखरपुडा झाल्यानंतर फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा झाला होता. यावेळी पवार कुटुंबीय एकत्र जमले होते.

काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाला शरद पवार यांनी अक्षता टाकायची संधी कधी देताय? अशी विचारणा केली होती. यामुळे आता आजोबांचा सल्ला मनावर घेत युगेंद्र पवार यांनी थेट साखरपुड्याची बातमी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे.

याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, सर्वात आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे. माझा भाचा युगेनचा साखरपुडा सुंदर तनिष्काशी झाला आहे! त्यांना आयुष्यभर भरपूर प्रेम आणि आनंद मिळो ही प्रार्थना. कुटुंबात तनिष्काचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!