Sharad Pawar : विधानपरिषदेत जयंत पाटील पराभूत का झाले? शरद पवारांनी सांगितलं सगळं गणित…


Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसच्या कोट्यातील सात मते फुटली. ही मते महायुतीला गेली. पण शरद पवार गटाचंही एक मत फुटले आणि त्यामुळे जयंत पाटील यांना पराभूत व्हावं लागले असे सांगितले जात आहे.

या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक आमदारांनी क्रोस वोटींग केल्याचा दावा आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. विधानपरिषद निवडणुकीत कुणी फसवले? की आणखी काही झाले? यावर पवारांनी भाष्य केले आहे.

शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या उमेदवारीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत एकमत असं झाले नव्हते. पण तरीही माझ्या मनात डाव्यांना कुठेतरी संधी मिळावी हे होते. म्हणून माझ्या पक्षाची मते त्यांना देऊ केली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उमेदवार दिला. Sharad Pawar

काँग्रेसने प्रथम क्रमांकाची सर्व मते घ्यावीत. आणि दोन नंबरची मते निम्मी सेना आणि जयंत पाटील यांना द्यावीत असं माझं मत होते. तसे झाले असते तर मविआचे तिन्ही उमेदवार जिंकले असते असे मला वाटतं. पण ते काही जमून आले नाही. त्यामुळे कोणी कोणाला फसवले नाही, फक्त स्ट्रॅटेजी चुकली, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!