शरद पवार यांच्या राजीनाम्याची कारणे आली समोर? जाणून घ्या.


मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदापासून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता थांबायची वेळ आली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. माहितीनुसार शरद पवारांच्या या निर्णयामागची ५ कारणे समोर आली आहेत. यामध्ये राष्ट्रवादीला अजित पवार यांच्या ताब्यात जाण्यापासून रोखणे.

सुप्रिया सुळे यांच्या ताब्यात पक्ष देणे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी ज्येष्ठ नेत्यांची गळती रोखणे. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष अद्यापही आपलेच नेतृत्व मानत असल्याचे दाखवून देणे. वाढते वय. अशी कारणे सांगितली जात आहेत.

अजित पवार यांच्या फुटीची शक्यता गृहीत धरून पक्षनेतृत्वात बदल केला जातोय, असेही म्हटले जात आहे. आता शरद पवार कोणाला अध्यक्ष करणार की आपला निर्णय मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!