Sharad Pawar : शरद पवारांचा राज्यात राजकीय धुमाकूळ! फडणवीसांच्या निकटवर्तीय असलेला आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला…
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा आणखी एक नेता मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
समरजीत घाटगे यांच्या पाठोपाठ आता फडणवीसांचे दुसरे निकटवर्तीय शिवाजी पाटील हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. चंदगडमधील भाजपचे नेते शिवाजी पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. Sharad Pawar
दरम्यान, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. दरम्यान जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. कागल पाठोपाठ गारगोटी, चंदगड मध्ये भाजपाला धक्का बसला आहे . आत्ता जोरदार धक्का इचलकरंजी मध्ये ऐनवेळेस बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.