Sharad Pawar : बारामती मतदारसंघावर शरद पवारांचा मोठा निर्णय; नातू रोहित पवार यांच्याकडे ही जबाबदारी
Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच शरद पवार यांनी बारामती मतदारसंघावर मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी त्यांचा नातू रोहित पवार यांच्यवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारीपदी रोहित पवार यांची नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार या सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे या खासदार आहेत. अजित पवार गटाचा राष्ट्रवादीचा उमेदवार महायुतीकडून रिंगणात उतरवला जाणार असून, शक्यतो अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असू शकतात, असे मानले जात आहे.
रोहित परवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते बारमती ॲग्री लिमिटेडचे सीईओ देखील आहेत. सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ त्यांनी प्रचार सुरू केला आहे.
गुरुवारी पक्षाचे कार्यकर्ते व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते सहभागी झाले होते. त्याचबरोबर ते अजित पवार यांच्या गट राष्ट्रवादीवरही हल्लाबोल करणारे आहेत, ज्यांनी गेल्या वर्षी काकांविरुद्ध बंडखोरी केली होती, त्यानंतर पक्षात फूट पडली होती.