Sharad Pawar : शरद पवार मराठा की ओबीसी?, शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल, काय लिहिलंय त्यात?, जाणून घ्या..

Sharad Pawar : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जोरदार आंदोलने सुरू आहेत. दोन्ही समाज आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भूमिका मांडली आहे. आरक्षणावरून राजकीय नेते वेगवेगळे मत मांडत असले तरी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वेगळ्या प्रकारे ट्रोल केले जात आहे.
काहींच्या मते शरद पवार ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या मागे आहेत तर काहींच्या मते मराठा आंदोलनाचे सूत्रधार शरद पवारच आहेत. असे आरोप मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर लावले जात आहे. हे सर्व सुरू असतानाच आता शरद पवार यांच्या शाळेचा दाखला व्हायरल केला जात आहे. त्याच्यावर पवारांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. Sharad Pawar
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल होत आहे. त्यावर शरद पवार यांची जात मराठा नोंदवण्यात आली आहे. पण शरद पवार यांनी ओबीसींचं सर्टिफेकट घेतल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत होता.
त्यामुळे शरद पवार हे ओबीसी झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, शरद पवार यांचे समर्थक विकास पासलकर यांनी पवार यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला दाखवत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांनी ओबीसींचं सर्टिफिकेट घेतलं नसल्याचा दावाही विकास पासलकर यांनी केला आहे.
शरद पवारांचं बारामतीत शिक्षण झालं आहे. एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जातं. या षडयंत्रकारी लोकांना कोणी तरी रसद पुरवते. हा षडयंत्राचा भाग आहे. कित्येक वर्षापासून हे सुरू आहे. सामाजिक विषय येतो तेव्हा खोलात जाऊन शोधावं लागते.
त्यामुळे पवार साहेबांच्या शाळेच्या दाखल्यावर काय लिहिलंय ते तुम्हीच पाहा. हा घ्या पुरावा. पवार मराठा असल्याचा हा धडधडती पुरावा आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांला बदनाम करण्याचं व्हिटॅमिन कुठून येतं? नागपूर सेंटरकडूनच हे व्हिटॅमिन पुरवलं जातंय, असा आरोप विकास पासलकर यांनी केला आहे.