Sharad Pawar : शरद पवार उतरले बारामतीच्या मैदानात! म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना त्यांची जागा दाखवणारच…


Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत.

नुकताच बारामती लोकसभा मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार शरद पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन पक्ष फोडून आले. ते त्याचे कर्तृत्व सांगत आहे. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना पक्षातील हजारो नाही तर लाखोंच्या संख्येनं चिवट शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना त्यांची योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. Sharad Pawar

पुढे ते म्हणाले की, काही जण दमदाटी करत आहेत. पण त्यांना हे माहीत नसेल की, दमदाटीला बळी पडणारी ही औलाद नाही. सुदैवाने आज बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. आपण नक्कीच जास्त जागा जिंकू. काही जणांनी व्यक्तिगत हल्ले सुरू केले आहेत. यांनी पक्ष फोडले. तरी कार्यकर्ते मजबुतीने उभे आहेत, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा..

महाविकास आघाडी बारामती लोकसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळाव्याला शरद पवार यांची उपस्थिती लावली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!