Sharad Pawar : राज्यात लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच, शरद पवारांनी थेट कारणच सांगितलं…


Sharad Pawar : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.

आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून गदारोळ सुरू आहे. योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर अर्थखात्याने देखील यावर आक्षेप घेतला आहे. या योजनांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

राज्याच्या तिजोरीमध्ये काही नाही. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेच्या माध्यमातून एखादा दुसरा हफ्ता देऊन जनमाणूस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो आहे. Sharad Pawar

लोकांमध्ये अशीही चर्चा आहे या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. पुर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे त्याचा काही ना काही परिणाम होईल असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

पवार पुढे म्हणाले, सरकारच्या या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. एखादं दुसरा हफ्ता देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही शरद पवार पुढे म्हणालेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!