Sharad Pawar : शरद पवारांनी घेतली ५५ वर्षांनंतर काकडे कुटूंबाची भेट, लोकसभेत काकडे कुटूंब कोणाला मदत करणार?
Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार हे बारामतीच्या राजकारण सक्रिय झाल्यानंतर त्यांचा सुरुवातीच्या काळात काकडे कुटुंबाशीच राजकीय संघर्ष झाला होता. काकडे कुटुंबातील सदस्यांनी आतापर्यंत लोकसभेपासून अगदी जिल्हा परिषदांपर्यंत विविध निवडणुकांमध्ये पवारांना आव्हान दिले होते.
मात्र २०१८ मध्ये हे राजकीय वैर संपलं आणि पवार यांनी काकडे कुटुंबातील एका व्यक्तीला सोमेश्वर कारखान्याच्या संचालकपदावर संधी दिली. मात्र शरद पवार काकडे कुटुंबाच्या घरी गेले नव्हते. अखेर आज ५५ वर्षांनंतर पवार यांनी काकडे कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव काकडे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ५५ वर्षांनंतर शरद पवार हे काकडे कुटुंबीयाला भेटले आहे. काकडे कुटुंबासह तावरे कुटुंबाचीही पवारांशी राजकीय संघर्ष झाला आहे. आधी शरद पवारांसोबत काम करणारे चंद्रराव तावरे हे अजित पवारांच्या राजकीय एंट्रीनंतर शरद पवारांपासून १९९७ साली दूर झाले. Sharad Pawar
त्यानंतर तावरे यांनी अजित पवारांविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत अपयश आले होते. असं असलं तरी बारामती परिसरात तावरे कुटुंबाचंही राजकीय वलंय आहे. अशा स्थितीत आज शरद पवार यांनी चंद्रराव तावरे यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी बंद दाराआड चर्चा झाली.
गेल्या पाच वर्षांपासून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काकडे कुटुंबीयांशी जुळून घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजित काकडे यांना त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधीदेखील दिली आहे.