Sharad Pawar : चहा आणि ढाब्यावर जाण्यासारखे पत्रकारांचे महाराष्ट्रात चित्र नाही, शरद पवार यांचा बावनकुळेंना टोला..


Sharad Pawar बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. २९) त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांनी पवार यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बावनकुळे बावनकुळेंच्या Chandrashekhar Bawankule वक्तव्याचा समाचार घेतला.

शरद पवार  Sharad Pawar म्हणाले की, महाराष्ट्रातील पत्रकार हे प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारची टिप्पणी करणे योग्य नाही. पत्रकारांनी महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा केली नव्हती. चहा आणि ढाब्यावर जाण्यासारखं पत्रकारांचे महाराष्ट्रात चित्र नाही. असे म्हणत शरद पवार यांनी बावनकुळेंना टोला लगावला आहे.

तसेच राज्यात सध्या मराठा आरक्षणाबाबतचे आंदोलन जोर धरत आहे. या आंदोलनावर प्रतिक्रिया देत शरद पवार म्हणाले की, ‘मराठा समाजाच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी ते आंदोलन, उपोषण करत आहेत.

राज्य सरकारने त्यांना शब्द दिलेला आहे की आम्ही त्यांचा प्रश्न सोडवू. तसंच ओबीसींना वाटतं की त्यांच्यातील आरक्षण इतर कोणी घेऊन नये, याचीही नोंद राज्य सरकारला घ्यावी लागेल. याबाबतही काही निर्णय घेऊ, असा विश्वास केंद्र सरकारने दिला आहे.

दरम्यान, मराठा समाजाला जी आश्वासनं दिली आहेत, त्यावर राज्य सरकार काय निर्णय घेतं हे ३०-३५ दिवसांत कळेल. त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. अन्यथा काय होईल हे आज सांगता येणार नसल्याचे पवार म्हणाले आहे.

इंडिया आघाडीत जागा वाटपावरून मतभेद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत बोलताना शरद पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका नाहीत. निवडणुका येतील, तेव्हा काही जागांवर मतभेद होतील, जागा वाटपाचे प्रश्न निर्माण होतील, तेव्हा ज्या पक्षांचा ज्या राज्यात इंटरेस्ट नाही, त्यांना आम्ही तिथे पाठवून मार्ग काढू.

सध्या मध्यप्रदेश आणि राजस्थानसह चार राज्यांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. तिथे एकवाक्यता करण्याचा प्रयत्न होईल. अजून प्रयत्न सुरू केला नाही. वाद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असेही शरद पवार यांनी म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!