‘शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही’, संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य….


पुणे : शिवप्रतिष्ठान हिंदूस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली आहे. लवासाची कीड काढून टाकली पाहिजे, असादेखील घणाघात संभाजी भिडे यांनी केला आहे.

संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. संभाजी भिडे यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. राज्याला अशी कीड लागली असून, लवासाची ही कीड काढून टाकू असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. ते कर्जत येथे लोहगड, भीमगड, भिवगड अशा गडकिल्ले मोहिमेसाठी आले आहेत, त्यावेळी संभाजी भिडे हे कर्जतमध्ये बोलत होते.

तसेच संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संभाजी भिडे यांनी याआधीदेखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यावेळी त्यांनी दोन दिग्गज व्यक्तींबद्दल वादग्रस्त केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!