Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला…


Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली. पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी नव्याने पक्ष बांधणीस सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच यश मिळाले.

आता शरद पवार यांनी आपले लक्ष आता विधानसभा निवडणुकीकडे वळवले आहे. राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किती जागांवर पक्षाला यश मिळेल, याबाबत त्यांनी भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी एका दिलेल्या मुलाखतीत राजकीय मुद्यांवर भाष्य केले. शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितले की, राज्यात सध्या महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण आहे. लोकांचा कल परिवर्तनाकडे दिसत असून आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात जवळपास ४० जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. Sharad Pawar

पक्षातील फुटीनंतर आपल्याला या निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास व्यक्त करताना शरद पवारांनी याआधी पडलेल्या फुटीनंतरच्या निवडणूक निकालांचा उल्लेख केला. याआधीदेखील मला आमदार सोडून गेले होते. मात्र, त्यातील फार कमीजण पुन्हा निवडणुकीत विजयी झाले.

लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्याला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ५०-६० जागांवर विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या प्रचाराच्या निमित्ताने आपण राज्यात फिरत असून लोकांचा कल लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!