Sharad Pawar : ‘गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद’, एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले…


Sharad Pawar : महिन्याभरापूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी असलेला शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली.

आरोपी अक्षय शिंदे हा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपासवर झालेल्या पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला होता. अक्षय शिंदे याने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला.

त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेवर शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. Sharad Pawar

बदलापूर प्रकरण कायद्याच्या कक्षेत सोडवायला हवे होते, असे शरद पवार म्हणाले. मात्र आरोपींच्या बदल्यात गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. असेही ते यावेळी म्हणाले. बदलापूरमधील दोन मुलींवर झालेल्या अन्यायाच्या प्रकरणाची कायद्याच्या कक्षेत चौकशी व्हायला हवी होती, असे ट्विट शरद पवार यांनी सोमवारी (ता.२३) केले.

भविष्यात अशा निंदनीय कृत्याचा कोणी विचारही करू नये म्हणून कायद्याचा धाक दाखवण्यात सरकार कमकुवत झाल्याचे दिसते. या घटनेची सखोल चौकशी केल्यास सत्य समोर येईल, अशी आशा आहे. असे शरद पवार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!