Sharad Pawar : पराभूत उमेदवारांची शरद पवार यांनी घेतली दिल्लीत बैठक, आगामी काळातील रणनीती ठरणार…

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करत आहेत.
ईव्हीएम विरोधातील लढाईला मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएम विरोधातील लढ्याची पुढची दिशा निश्चित करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची कारणे आणि ईव्हीएमच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली.
उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींबाबत आपली मते मांडली. शरद पवार यांनी या चर्चेत ईव्हीएमच्या मुद्द्यावर अधिक चर्चा करून पक्षाची पुढील रणनीती ठरवण्याचे संकेत दिले आहेत. Sharad Pawar
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, अश्विनी कदम, सचिन दोडके अशोक पवार, काँग्रेसचे संजय जगताप, अविनाश बागवे यांच्यासह नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर देखील उपस्थित होते.