Sharad Pawar : शरद पवार यांनी संभाजी भिडे यांची थेट लायकीच काढली, नेमकं घडलं काय?

Sharad Pawar : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत मांडलेल्या भूमिकेवर राज्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. संभाजी भिडे यांच्या मते मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. त्यांनी अप्रत्यक्षपणे तशीच भूमिका मांडली आहे.
त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील अनेक नेतेमंडळींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवारांनी खोचक टीका करत फार बोलणं टाळले आहे. Sharad Pawar
संभाजी भिडे हे काय कमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का? काहीही प्रश्न विचारतात. म्हणून तुम्हाला भेटायचं नाही म्हणतो. हल्ली कसेही प्रश्न तुम्ही विचारता, आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक.. , असं म्हणत शरद पवार यांनी त्यावर फार प्रतिक्रिया देणं टाळले आहे.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलेआहे.