शिवसेनेच्या बंडाबद्दल शरद पवारांनी वेळीच उद्धव ठाकरेंना दिला होता इशारा…!


मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीचा इशारा शरद पवार यांनीच उद्धव ठाकरेंना दिला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केला आहे

शरद पवारांच्या इशाऱ्यानंतरही आपल्या पक्षाचे आमदार असे पाऊल उचलू शकतील असे उद्धव ठाकरेंना वाटले नव्हते, असेही अजित पवार म्हणाले. गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केले, त्यामुळे शिवसेना फुटली आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारही पडले.

याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. शिवसेनेत फूट पडू शकते, असे वाटत असल्याचे अजित पवार यांनी एका प्रसारमाध्यम संस्थेशी केलेल्या संवादात सांगितले. खुद्द शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून ही भीती व्यक्त केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!