Sharad Pawar Group : शरद पवार गटाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, ‘तो’ दाखला देत थेट प्रश्न विचारले

Sharad Pawar Group नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार की अजित पवार यावरून पक्षातील दोन गटात वाद सुरू आहे. राष्ट्रवादी फुटीसंदर्भात ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने एकांगी निर्णय घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला आहे. Sharad Pawar Group
शरद पवार गटाने Sharad Pawar Group वकिलांमार्फत निवडणूक आयोगासमोर आपली भूमिका मांडली आहे. विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट असल्याचे मान्य कसे केले? असा सावाल यावेळी निवडणूक आयोगाला करण्यात आला आहे. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात होणार असल्याची माहिती आहे.
तसेच अजित पवार गटाने निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. या याचिकेबाबत ही सुनावणी पार पडणार आहे. ६ तारखेच्या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडणार आहेत. सहा तारखेच्या सुनावणीत निवडणूक आयोगाकडून दोन गट असल्याचे मान्य करत सुनावणी घेण्याचे निश्चित आहे.
दरम्यान, शरद पवार गटाला आपलं म्हणणे मानण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ न दिल्याचा देखील शरद पवार गटाकडून उत्तरात नमूद करण्यात आले आहे. शरद पवार गटाकडून आपले म्हणणे ऐकूनच निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.