Sharad Pawar : शरद पवारांचा अजित पवारांना दे धक्का! पुण्यात दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, सगळं समीकरण बदलणार…

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. निववडणुकीआधी शरद पवारांनी रणनिती आखायला सुरूवात केली आहे. पुणे जिल्ह्यात नव्याने पक्षाला उभं करण्यासाठी त्यांनी रणनिती आखली आहे.
जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. आज शरद पवार पुण्यात आहेत. पुण्यातील मोदी बागेत असणाऱ्या शरद पवारांच्या निवास्थानी नेते आणि कार्यकर्त्याची भेटीसाठी गर्दी झाली आहे.
यातच अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे पुण्यात आणि सोलापुरात राजकीय बदलाचे संकेत दिसत आहेत. दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे. Sharad Pawar
अजित पवारांचे दोन मोठे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत.
पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील सरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.