Sharad Pawar : अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटवरून शरद पवार यांचे मिश्किल उत्तर, पत्रकाराच्या प्रश्नावर घेतली शाळा, नेमकं काय घडलं…
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यातून सावरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी सुरू केलेल्या ‘जनसन्मान यात्रे’त त्यांच्या विशेष पेहरावाची चर्चा होत आहे. एरवी पांढऱ्या शुभ्र झब्बा पायजम्यात दिसणाऱ्या अजित पवार यांनी सदऱ्यावर अचानक गुलाबी जॅकेट चढवले आहे.
महिलांचा आवडता गुलाबी रंग पक्षाला लाभदायक राहील, असे त्यांना सांगितल्याने अजितदादांनीही जवळपास डझनभर गुलाबी रंगाची जॅकेट्स शिवून घेतले आहेत. अजित पवार यांच्या बदलत्या रंगावरून त्यांचे काका, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. Sharad Pawar
आक्रमक, रांगडे दिसणारे अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये वेगळ्याच ढंगात पाहायला मिळत आहेत. गुलाबी जॅकेट परिधान केल्याने महिलांची मते मिळतील असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. Sharad Pawar
शरद पवार यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्यावरून पवार म्हणाले, तुम्ही निळ्या कलरचे शर्ट परिधान केले आहे. तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का…? पवारांच्या या उत्तराने पत्रकारांमध्ये हास्यकल्लोळ झाला. शरद पवार यांनी दिलेल्या उत्तराने अजित पवारांच्या बदलत्या रंगाच्या भूमिकेचा त्यांना फायदा होणार नाही, असेच पवारांनी अप्रत्यक्ष सुचविले आहे.